दैनिक स्थैर्य । दि. १३एप्रिल २०२३ । सातारा । जिल्ह्यात आनंदाचा शिधा वाटप सुरु झाले असून, उद्यापर्यंत बहुतांश शिधा वाटप पूर्ण होणार असल्याची माहिती त्रिगुण कुलकर्णी उपायुक्त पुरवठा पुणे विभाग यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण 3 लाख 87 हजार 441 आनंदाचा शिधा किट प्राप्त झाले आहेत. शासकीय गोदामांमधून सदर किट रास्तभाव दुकांनामध्ये वितरित करण्यात आले आहेत. या कीटमध्ये प्रत्येकी 1 कि. रवा, चनाडाळ, साखर व 1 लिटर पामतेल यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील अंत्योदन अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना फक्त 100 रुपयात हे किट वितरित करण्यात येत आहे. जिल्ह्यात आनंदाच्या शिधाचे वाटप सुरु झाले असून, उपायुक्त पुरवठा पुणे व जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा यांच्या हस्ते आनंदाचा शिधा या संचाची निवडक लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.