क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्यावतीने उमाजी नाईक चौकात मोफत औषधांचे वाटप

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 09 जुलै 2024 | फलटण | येथील क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने फलटण येथील उमाजी नाईक चौक येथे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने मोफत औषध वाटप करण्यात आले आहे.

प्रतिवर्षी उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून फलटण शहरातील उमाजी नाईक चौक येथे मोफत औषध वितरीत करण्यात येते. प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मोफत औषध वितरण करण्यात आले. यावेळी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे, उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शाहुजी मदने, डॉ. सुभाष गुळवे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सदरील उपक्रमाबाबत शाहुजी मदने, डॉ. सुभाष गुळवे यांच्यासह मानयवरांनी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे यांचे विशेष आभार मानले व आगामी काळात सुद्धा असेच सहकार्य लाभणार असल्याची ग्वाही मिलिंद नेवसे यांनी यावेळी दिले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!