दैनिक स्थैर्य | दि. २१ जून २०२४ | फलटण |
फलटण तालुक्याच्या पूर्वभागातील गोखळी येथील महेंद्र गावडे, दिलावर शेख, कुमारी शिवानी लोंढे, सुजाता खंडू सूर्यवंशी या चार दिव्यांगाना जिल्हा परिषदेच्या ५% टक्के फंडातून मिळालेल्या इलेक्ट्रिक तीन चाकीचे वितरण फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. अभिजीत जाधव म्हणाले, मी फलटणला हजर झाल्यापासून जनसेवक सागर गावडे यांची दिव्यांग, विधवा, परितक्त्या महिलांना मदत करण्यासाठी धडपड पहात आहे. त्यांच्या प्रयत्नातून अपंगांना विशेष सहाय्य कक्षाच्या माध्यमातून घरपोच मदत, वृध्द पेन्शन योजनेची विना तक्रार अंमलबजावणी तसेच संजय गांधी निराधार योजनेतून ४०० पेक्षा अधिक परितक्त्या महिलांना विनात्रास मदत मिळवून देणे, दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन, अपघातग्रस्तांना रोटरी क्लबच्या माध्यमातून कृत्रिम हातपाय उपलब्ध करून देणे, कोविडच्या काळात लोकसहभागातून मोफत विलिनीकरण कक्ष उभारणी, कॅन्सरग्रस्त, अपघातग्रस्त, गरीब गरजू रुग्णांना मोफत रुग्णसेवा उपलब्ध करून देणे या जनसेवक सागर गावडे यांच्या कार्याचा आदर्श युवकांनी घेतला पाहिजे, असे प्रतिपादन तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जनसेवक सागर गावडे यांनी केलेल्या कामाचा कार्य अहवाल प्रकाशन सोहळा आणि जेईई अॅडव्हान्हान्समध्ये यश मिळालेले रोहन यादव, कृषी सहायकपदी निवड झालेल्या कु. सोनाली ज्ञानदेव काशिद, कु. शुभांगी रायाजी जगताप या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, वारकरी शिक्षण संस्थेत ग्रंथ वाटप, दहावी बारावीतील प्रथम तीन क्रमांकाचा सत्कार व गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव बापू गावडे (सवई), जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वास गावडे, श्रीराम बझाचे संचालक मारुती बापू गावडे, आसू मंडलाधिकारी दिलीप कोकरे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष पै. बजरंग नाना गावडे (सवई ), तानाजी बापू गावडे (सवई), बापूराव गावडे, बजरंगनाना गावडे, माजी सरपंच नंदकुमार गावडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे, रमेश दादा गावडे सवई, ग्रामविकास अधिकारी गणेश दडस, प्रहार अपंग क्रांती संघटना संपर्कप्रमुख महेश जगताप, माजी सरपंच अमित भैया गावडे, संतोष दादा गावडे, विकास शिंदे पाटील, गोखळी विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन काशिनाथ गावडे, उदयसिंह गावडे, सामाजिक कार्यकर्ते राधेमश्याम जाधव, महिंद्रा अण्णा गावडे, दिलावर शेख, योगेश हरिहर, ज्ञानदेव काशीद, डॉ. सुरेश गावडे, विलास गावडे, सुजित महाराज, राहुल गावडे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र भागवत, त्रिमक बाराते, बाबासो गावडे, हणमंत यादव, दिलीप गावडे सर, अमोल गावडे सर, दीपक चव्हाण, अभिजीत जगताप, माजी उपसरपंच डॉ. अमित गावडे, संतोष गावडे, प्रसाद जाधव, पै. प्रमोद गेजगे, चांगदेव शिरतोडे, पप्पू रोकडे, अमोल रोकडे, श्रीकांत माने, बापू माने, पांडुरंग जाधव, परीक्षित जगताप, गणेश गावडे, शुभम गावडे, योगेश गावडे, मुन्ना शेख, स्वप्निल पवार, शाहरुख शेख, हर्षद कोकणे, आदित्य गावडे, प्रसाद गावडे, शंभू आटोळे, संकेत गावडे, शेखर लोंढे, प्रवीण गावडे, अभिजीत रोकडे आदींसह सर्व दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.