संगणकीय पद्धतीने घरपट्टी व पाणीपट्टी जमा करावी

नगरसेवक अशोक जाधव यांचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन


दैनिक स्थैर्य | दि. २१ जून २०२४ | फलटण |
फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी फलटणमधील मिळकतधारक यांची संगणकीय पद्धतीने घरपट्टी व पाणीपट्टी जमा करावी, अशी मागणी मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत त्यांनी मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फलटणमधील मिळकतधारकांची घरपट्टी व पाणीपट्टी भरणा करतेवेळी वसुली अधिकारी यांच्याकडून काही प्रमाणात घोळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नगरपरिषदेने मिळकतधारकांची विश्वासार्हता सांभाळण्यासाठी मिळकतकर हा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येऊन त्याची पावती ऑनलाईन पद्धतीने मिळकतधारकांना देण्यात यावी, असे म्हटले आहे.

हे निवेदन देताना माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, अमीर शेख आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!