
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २९ मार्च २०२३ । मुंबई । समाजातील दिव्यांग बांधवांस ग्रामपंचायत निधीमधून ठराविक टक्के देण्याची योजना सरकार दरबारी सुरू असली तरी त्याबद्दल पुरेपूर माहिती नसल्याने अनेक वेळा त्याचा लाभ लाभार्थ्यांना होत नाही परंतु नेहमीच पारदर्शक व्यवहार करून लाभार्थ्यांना योजनांचा योग्य तो लाभ करून देण्याबाबत नावलौकिक असलेल्या देवद ग्रामपंचायतीने यावर्षीही देवद गावातील दिव्यांग बंधू-भगिनींना दिव्यांग कल्याण निधीचे वाटप केले.
गावातील दिव्यांग बंधू-भगिनींना एकत्र घेऊन त्यांना निधी मिळवून देण्यासाठी विजय वाघमारे यांनी पत्रव्यवहार व पाठपुरावा करून ग्रामपंचायत निधीतून दिव्यांग कल्याण निधी दिव्यांग बंधू-भगिनींना मिळवून दिला, त्याबद्दल दिव्यांग बंधू कनकेश्वर (बंटी) रसाळ यांनी सर्वांतर्फे विजय वाघमारे यांचे आभार मानले.
