दैनिक स्थैर्य | दि. २६ जून २०२३ | फलटण |
‘पढेगा फलटण, बढेगा फलटण’ हे ब्रिद घेऊन चालणार्या हाजी नियाज फौंडेशन, फलटण उर्दू एज्युकेशन सोसायटी फलटण व नेमत पेट्रोलियम फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व वारकरी भक्तांना बिस्किटे आणि पाण्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी फलटण उर्दू एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक हाजी नियाज अहमद कुरेशी, अध्यक्ष इम्रान नियाज अहमद कुरेशी, हाजी मुख्तार कुरेशी, हाजी शकुर कुरेशी, तालिब कुरेशी, बिलाल कुरेशी, बाशीद कुरेशी, उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. तांबोळी एम. एल., हायस्कूलचे प्राचार्य श्री. अक्रम मुल्ला व मुस्लिम समाजातील तरुण मंडळी आणि शाळेचे शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल हाजी नियाज फौंडेशन, फलटण उर्दू एज्युकेशन सोसायटी फलटण व नेमत पेट्रोलियम फलटण यांचे वारकर्यांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले.