
दैनिक स्थैर्य । 10 जून 2025। बारामती। वटपौर्णिमेनिमित्त अनेक ठिकाणी वडाची फांदी तोडून त्याचे पूजन केले जाते. परंतु पर्यावरण संतुलनासाठी घरासमोर किंवा जवळील बागेत, रस्त्याच्या कडेला गल्लीत, प्रभागात, वार्डात किंवा शेतात वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करावे, या हेतूने हनुमाननगर महिला बचत गट यांच्यावतीने बारामती महिलांना वडाचे व पेरुच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी हनुमान नगर महिला बचत गटाच्या अध्यक्षा अर्चना सातव, उपाध्यक्षा हर्षदा सातव, माधवी शेडगे, सीमा सातव, कविता खाडे, माधुरी कुंभार, सुप्रिया पवार, गौरी सावळे पाटील, वीणा फडतरे, प्रियांका जराड, दिपिका नेरकर, सुचेता ढवाण, भारती शेळके, संगीता साळुंखे, मनीषा खेडेकर, विद्या निंबाळकर आदी महिला उपस्थित होत्या.
सहा वर्षापासून या उपक्रमाचे आयोजन करत आहे. वडाचे वृक्षारोपण केल्याने वड मोठे झाल्यावर सावली देते, मुळ्या पाणी धरून ठेवतात. परिसरात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. वडाच्या झाडाचे संगोपन करण्यासाठी मोफत खत व ट्री गार्ड देणार असल्याचे अर्चना सातव यांनी सांगितले माधवी शेडगे म्हणाल्या, रस्त्याच्या कडेला वडाचे वृक्षारोपण केल्यास संस्कृती, अध्यात्म व पर्यावरण जपले जाईल. यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अॅड. वीणा फडतरे यांनी आभार मानले.