चर्चा तर होणारच : दोन्ही राजेंनी घेतल्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.१८: खासदार उदयनराजे भोसले यांनी आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यानंतर शरद पवारांची भेट घेतली. भेटीबाबत त्यांनी  मीडियाला कोणतीही माहिती दिली नाही. त्याचवेळी त्यांचेच बंधू आमदार  शिवेंद्रराजे यांनीही आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दुसर्‍यांदा भेट  घेतली. त्यांनीही मतदार संघातील विकास कामांच्या अनुषंगाने भेट घेतल्याचे  सांगण्यात आले. या भेटींमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तडीला न्यायचाच या इराद्याने  कामाला लागलेले आहेत. त्यांनी मागच्याच चार दिवसांपूर्वी दिल्लीत खासदार  शरद पवारांची भेट घेत वडिलकीच्या नात्याने मराठा आरक्षणाचा प्रश्‍न  सोडवावा, अशी विनंती केली होती. राजकारण बाजूला ठेवून खासदार  उदयनराजे यांनी दिल्लीत अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडे  सातार्‍यासाठी नवीन काही आणता येईल, याचा प्रयत्न केला.दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट  घेतली. त्यांच्या भेटीनंतर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट  घेतली. तब्बल अर्धा तास दोघांच्यात चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी आपला  ताफा शरद पवार यांच्याकडे वळवला. शरद पवार यांची दुसर्‍यांदा भेट  घेतल्याची चर्चा रंगत होती. या भेटी त्यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने  पक्षीय मतभेद बाजुला ठेवून घेतल्याचे समजते.

खासदार उदयनराजे हे मुख्यमंत्र्यांना भेटण्याची वार्ता सातार्‍यात पसरली. त्याच  बरोबर आमदार शिवेंद्रराजेही उपमुख्यमंत्री अजितदादा यांना भेटले. अ जितदादांची आणि त्यांची दुसरी भेट होती. अजितदादांची पहिली भेट बारामती  येथे त्यांनी घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी मुंबईत जावून निवासस्थानी भेट  घेतली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतर मुद्दे असल्याने त्यांच्या भेटीला  महत्व आहे.

आमदार शशिकांत शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत  आमदार शिवेंद्रराजे हे राष्ट्रवादीत आले तर त्यांच्याकडे सातारा पालिकेच्या  निवडणूकीची जबाबदारी असेल असे सूचक वक्तव्य केले होते. त्याच अनुषंगाने  तर भेट घेतली नाही ना अशी चर्चा सुरु होती. मात्र, आमदार शिवेंद्रराजेंनी  आजची भेट मतदार संघातील विकास कामांच्या अनुषंगाने असल्याचे सांगितले.


Back to top button
Don`t copy text!