सोळा वर्षीय मुलीचे बत्तीस वर्षीय ड्रायव्हरने केले अपहरण, मेढा पोलीस स्थानकासमोर ठिय्या


स्थैर्य, सातारा, दि.१८: जावळी तालुक्यातील एका दुर्गम गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे देवदास तानाजी साबळे (वय ३२, रा. नरफदेव) याने अपहरण केले. याबाबतची कुटुंबीयांनी कुडाळ पोलिस स्थानकामध्ये तक्रार दिली असून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांकडून तपास झाला नसल्याने व योग्य ती माहिती मिळत नसल्याने कुटुंबीयांनी थेट मेढा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.

यासंदर्भात कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार  देवदास हा ड्रायव्हर आहे. संशयित आरोपी याने घरात कोणीही नसताना या घटनेचा फायदा घेत 16 वर्षीय  अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. या घटने नंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र चार दिवस गेल्यानंतर देखील पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे कुटुंबीय व ग्रामस्थ अस्वस्थ होते. बुधवारी त्याचा उद्रेक झाला व पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.


Back to top button
Don`t copy text!