उद्योग विकास आयुक्त पदाचा कार्यभार दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी स्वीकारला

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । उद्योग विकास आयुक्त तसेच मैत्री कक्षाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आज स्वीकारला.

उद्योग संचालनालयाच्या मुंबई कार्यालयात डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडून श्री. कुशवाह यांनी कार्यभार स्वीकारला.

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या प्राधान्य असलेल्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी उद्योग संचालनालय कार्यरत राहील, असे श्री. कुशवाह यांनी यावेळी सांगितले.

श्री. कुशवाह २००६ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. याआधी जिल्हाधिकारी, सांगली, नाशिक, मुंबई उपनगर, मुख्य कार्यकारी अधिकारी – म्हाडा, आयुक्त, कौशल्य विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी अशा विविध पदांवर कार्यरत राहिले असून एक अभ्यासू, कर्तव्यदक्ष, नाविन्यपूर्ण विचारसरणी व प्रशासनाचा गाढा अभ्यासक म्हणून श्री. कुशवाह यांची ओळख आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!