सभासदांच्या विश्वासावर प्रगतिपथावर असणारी महाराजा मल्टीस्टेट सामाजिक उपक्रमात अग्रेसर – दिलीपसिंह भोसले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
आज बँकिंग क्षेत्रात आधुनिकीकरण वेगाने वाढत असल्याने विविध बँका, ग्राहक संस्था यांचा विस्तार वाढत आहे. अशा स्थितीत पारदर्शक कारभार, सभासदांचा विश्वास या बळावर संस्थेचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ अर्थार्जन न करता सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणार्‍या महाराजा मल्टीस्टेटने सभासदांना वैद्यकीय सेवा कमी खर्चात मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन दिलीपसिंह भोसले यांनी केले.

महाराजा मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीच्या १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले उपस्थित होते.

दिलीपसिंह भोसले म्हणाले की, आज महाराजा मल्टीस्टेटला नॅशनल अ‍ॅवॉर्ड तीनवेळा व सह्याद्री अर्थरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. कोअर बँकिंगची सुविधा उपलब्ध करून अत्याधुनिक पद्धतीने संस्थेचा कारभार व कामकाज केले जात आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अत्याधुनिक व सर्व सुखसुविधा सभासदांना उपलब्ध करून देण्यासाठी संस्था व संचालक मंडळ कार्यशील आहे.

प्रास्ताविकामध्ये बोलताना संस्थेचे व्हा. चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात संस्थेस १ कोटी २ लाख नफा, ८९ कोटी ८५ लाख ठेवी, ५९ कोटी ३३ लाख कर्जवाटप केले असून वार्षिक उलाढाल ८३६ कोटी असल्याचे सांगून संस्थेने संस्थेचे प्रधान कार्यालय अत्याधुनिक करण्यासाठी वाटचाल चालू केलेली आहे. तसेच नवीन शाखांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्या असून लवकरच त्यास मंजुरी मिळेल. मंजुरी मिळाल्यानंतर नवीन शाखा सुरू करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे श्री. भोसले यांनी याप्रसंगी सांगितले.

दरम्यान, राजाळे (ता. फलटण) येथील शहीद वीर जवान वैभव भोईटे यांच्या मातोश्रीस एक लाख रूपयांचा धनादेश देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

संस्थेचे सीईओ संदीप जगताप यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले व सूत्रसंचालन केले. संचालक अमोल सस्ते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सभेस संस्थेचे संचालक तसेच सभासद उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!