गंगाखेड तालुक्यातील होलार बांधवांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना कठोर शिक्षा करावी

होलार समाज यंग ब्रिगेड संघटनेचे सातारा पोलीस अधीक्षकांना निवेदन


दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील दलित होलार समाजातील बांधवांना झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करत या प्रकरणातील दोषी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी होलार समाज यंग ब्रिगेड संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे करण्यात आली आहे. संघटनेने आपल्या मागणीचे निवेदन सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना दिले आहे.

निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, दिवसेंदिवस होलार समाज बांधवांवर अन्याय-अत्याचार वाढत आहेत. प्रशासनाने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, अन्यथा होलार समाज यंग ब्रिगेडच्या महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

निवेदन देताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब नामदास यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!