धुमाळवाडीत २९९ महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख; विशेष ग्रामसभेत प्रमाणपत्रांना मान्यता

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमांतर्गत धुमाळवाडीतील २९९ महिला शेतकरी अर्जांना ग्रामसभेत मंजुरी देऊन प्रमाणपत्रे देण्यात आली.

स्थैर्य, धुमाळवाडी, दि. ०२ ऑक्टोबर : राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडी येथे महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ अंतर्गत ऑनलाइन प्राप्त झालेल्या २९९ महिला शेतकरी अर्जांना विशेष ग्रामसभेत सर्वानुमते मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे महिला शेतकऱ्यांना शासकीय योजना आणि कृषी सेवांचा थेट लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

शासकीय योजनांचा लाभ मिळणे सोपे

सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी महिला शेतकरी प्रमाणपत्राची पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि त्यामुळे मिळणाऱ्या विविध सुविधांबाबत ग्रामस्थ व महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रमाणपत्राद्वारे महिला शेतकऱ्यांना विविध शासकीय कृषी योजना, कृषी कर्ज, पीक विमा आणि कृषी निविष्ठांचा लाभ अत्यंत सुलभतेने घेता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामसभेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या विशेष ग्रामसभेस धुमाळवाडीतील महिला शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी मोनिका मुळीक, कृषी सखी माधुरी हुंबे, ग्रामपंचायत सदस्य तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!