![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2024/12/Sachin-Patil-1.jpg?resize=709%2C354&ssl=1)
दैनिक स्थैर्य | दि. ०१ फेब्रुवारी २०२५ | फलटण | फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार धोम बलकवडीच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी वर्गातून आमदार सचिन पाटील यांच्याकडे होत होती. या मागणीला आता यश मिळाले आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आमदार सचिन पाटील यांनी धोम बलकवडीच्या आधिकाऱ्यांशी संवाद साधून आवर्तन लवकरात लवकर सोडण्या विषयी सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आज धोम बलकवडीचे उपअभियंता श्री. हरणे यांनी आज पासून आवर्तन चालू केले आहे. या निर्णयाची माहिती देताना उपअभियंता श्री.हरणे यांनी समक्ष आमदार सचिन पाटील यांची भेट घेतली.
धोम बलकवडीचे आवर्तन वेळेत सुटल्यामुळे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनेक दिवसापासूनचे पाण्याचे संकट दूर झाले आहे. शेतकऱ्यांना हि मागणी पूर्ण झाल्याने त्यांच्या चेहर्यावर आनंद दिसून येत आहे. आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना या हंगामात पाण्याची कमी भासणार नाही हे नक्की आहे.
शेतकऱ्यांनी आमदार सचिन पाटील यांचे आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की आमदार साहेबांच्या प्रयत्नांमुळे आमची मागणी पूर्ण झाली आहे आणि आता आम्हाला पाण्याची कमी भासणार नाही. या निर्णयाने शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्याची आशा निर्माण झाली आहे.