युवा नेते धीरज विलासराव देशमुख फलटणच्या “जय – व्हिला”वर; श्रीमंत रघुनाथराजेंच्या सोबत घेतला जेवणाचा आस्वाद

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२४ | फलटण | माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे सुपुत्र तथा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अर्थात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धीरज विलासराव देशमुख यांनी फलटण येथील श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या “जय – व्हीला” या निवासस्थानी सदिच्छा भेट देत श्रीमंत रघुनाथराजेंच्या सोबत जेवणाचा आस्वाद घेतला.

सध्या राज्यामध्ये प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे सुपुत्र तथा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अर्थात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धीरज विलासराव देशमुख यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या समवेत सदिच्छा भेट दिली.

श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या वतीने धीरज विलासराव देशमुख यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, महेश ढवळे यांच्यासह धीरज देशमुख यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती होती.

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!