सुरवडी गणात धनंजय साळुंखे-पाटलांचा ‘झंझावात’; नीरा-देवधरच्या पाण्याने फिरवली हवा! महायुतीला मिळतोय प्रचंड प्रतिसाद


फलटण तालुक्यातील सुरवडी गणात भाजपचे उमेदवार धनंजय साळुंखे-पाटील यांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद. नीरा-देवधर आणि धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचा महायुतीला पाठिंबा. साळुंखे-पाटील कुटुंबाची एकजूट आणि महिलांचा पुढाकार. वाचा सविस्तर…

स्थैर्य, फलटण, दि. ३१ जानेवारी : फलटण तालुक्यातील सुरवडी (Suravadi) गणात भारतीय जनता पार्टी (BJP) व महायुतीचे उमेदवार धनंजय दादा साळुंखे–पाटील (Dhananjay Salunkhe-Patil) यांच्या प्रचाराचा जोरदार ‘झंझावात’ पाहायला मिळत असून, संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः नीरा-देवधर आणि धोम-बलकवडी कालव्यांमुळे सुटलेला पाणीप्रश्न या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला असून, त्यामुळे मतदारांचा कौल महायुतीकडे असल्याचे स्पष्ट होत आहे.

महिला शक्तीचा प्रचारतोफ

या प्रचार मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे साळुंखे-पाटील कुटुंबातील महिलांनी घेतलेला पुढाकार. सौ. विमलताई साळुंखे–पाटील व सौ. शरयू साळुंखे–पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या प्रचार फेऱ्यांना जनतेमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच, धनंजय दादांच्या पत्नी सौ. ज्योत्स्ना वहिनीसाहेब साळुंखे–पाटील यांनीही थेट मतदारांच्या दारात जाऊन संवाद साधला आहे.

दिग्गजांचे पाठबळ

या प्रचार मोहिमेला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव (तात्या) साळुंखे–पाटील आणि महिला नेत्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.

पाणी प्रश्नावर मतदारांचा विश्वास

घाडगेमळा, घाडगेवाडी, ढवळेवाडी, नांदल, निंभोरे, मिरगाव, मुळीकवाडी व वडजल या गावांमध्ये प्रचार दौरा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी सांगितले की, “माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून नीरा–देवधर आणि धोम–बलकवडी कालव्यांचे पाणी या भागात आले. त्यामुळे आमचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला असून शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले असून, या कामाची पोचपावती म्हणून आम्ही भाजप व महायुतीसोबत ठामपणे उभे राहणार आहोत.”

सर्वच घटकांचा पाठिंबा रणजितसिंह नाईक निंबाळकर व आदरणीय तात्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली पाणीपुरवठा, शेती विकास व ग्रामीण समृद्धीची कामे मतदारांपर्यंत पोहोचवण्यात कार्यकर्ते यशस्वी ठरत आहेत. महिला, युवक, शेतकरी, व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच स्तरातून धनंजय साळुंखे-पाटील यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, त्यांना भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!