ठाणे पोलिस दलातील धामणेरचे सुपुत्र विजय थोरात यांचे निधन


स्थैर्य, कोरेगाव, दि.०७: ठाणे पोलिस दलात कर्तव्य बजावत असलेले विजय रघुनाथ थोरात (वय 50, सध्या रा.ठाणे मूळ रा.धामणेर ता.कोरेगाव जि.सातारा) यांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ते एसटीमधून मूळ गावी येत असताना शिरवळ येथे घटना घडली. दरम्यान, प्राथमिक माहिती नुसार चालू एसटीमध्ये छातीत दुखू लागल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, विजय थोरात हे मूळचे धामणेर गावचे आहेत. ते पत्नीसोबत ठाणे- कोल्हापूर या एसटीने सोमवारी सकाळी येत होते. एसटी शिरवळनजीक आल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागला. वेदना तीव्र झाल्याने एसटी चालकाने एसटी शिरवळमधील हॉस्पिटलमध्ये नेली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याघटनेने त्यांच्या पत्नीला धक्का बसला.
पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विजय थोरात यांच्याबाबत सर्व माहिती घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, विजय थोरात हे ठाणे पोलिस मुख्यालयात कर्तव्य बजावत होते. त्यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर शोककळा पसरली.


Back to top button
Don`t copy text!