
दैनिक स्थैर्य । दि. ०६ जानेवारी २०२३ । फलटण । ना. अजयकुमार मिश्रा यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व अन्य मान्यवरांसह सुवर्ण पदक विजेती राष्ट्रीय खेळाडू कु. देविका घोरपडे यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन व सत्कार केला. यावेळी कु. देविका घोरपडे हिच्याशी मनमोकळे पणाने संवाद यावेळी ना. अजयकुमार मिश्रा यांनी साधला. कु. देविका घोरपडे हिचे यश हे कौतुकास्पद असून आगामी काळामध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदके ती नक्कीच आणेल, असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते, माजी मंत्री बाळा भेगडे, प्रशांत परिचारक, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सातारा व सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.