
दैनिक स्थैर्य । दि. ०६ जानेवारी २०२३ । फलटण । भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहराज्य मंत्री ना. अजयकुमार मिश्रा दोन दिवस फलटण दौऱ्यावर असून फलटण येथील श्री हरिबुवा मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले व महाआरती केली.
यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री बाळा भेगडे, प्रशांत परिचारक, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सातारा व सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
पुरातन श्री हरिबुवा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर महाआरती केली, श्री हरिबुवा देवस्थान ट्रस्टच्यावतीने केंद्रीय गृह राज्य मंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांचे आणि खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सह अन्य मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून यथोचित स्वागत ट्रस्टच्या वतीने जीवन केंजळे यांनी केले.