उद्याच्या ना. फडणवीस यांच्या दौर्याबाबत फलटणमध्ये राष्ट्रवादीची कार्यकर्ता बैठक


दैनिक स्थैर्य | दि. 16 जानेवारी 2024 | फलटण | राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे उद्या फलटण दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यामध्ये होत असणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) समाविष्ट होणार का ? याबाबत विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील निवासस्थानावर कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या विविध नेत्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

फलटण तालुक्यामध्ये सर्वांगीण विकास करत असताना विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये किती व कोणत्या प्रकारे संघर्ष करावा लागला आहे; हे सर्वांनीच पाहिले असून आत्ता महायुतीच्या माध्यमातून कार्यरत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मजबूत राहण्यासाठी अंतर्गत असणारे गट तट बाजूला ठेवून सर्वांनी कामकाज करण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त केले गेले असल्याचे समजत आहे.

आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघांमधून महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी मागावी; अशी आग्रही मागणी काही कार्यकर्त्यांनी केली असल्याचे समोर येत आहे.

उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे उद्या फलटण दौऱ्यावर असताना फलटणकरांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर व मुधोजी मनमोहन राजवाडा येथे सुद्धा येणार असल्याची चर्चा झाली असल्याचे समोर येत आहे.


Back to top button
Don`t copy text!