रुई मध्ये विकास कामे व विद्यार्थ्यांचा सन्मान


दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२२ । बारामती । सीईटी,नीट परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थी व पालक यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 30 सिमेंट चे बाकडे सेवानिवृत्त प्रा. अजिनाथ हरिभाऊ चौधर यांचे वतीने देण्यात आलेले आहेत त्याचा लोकार्पण सोहळा रविवार 18 सप्टेंबर रोजी संपन्न झाला.

या प्रसंगी शहर राष्ट्रवादी चे अध्यक्ष इम्तियाज शिकिलीकर मा. नगरसेवक सुरज सातव, पोलीस उपनिरिक्षक संदेश ओमासे, रुई चे माजी सरपंच मछिंद्र चौधर व पांडुरंग चौधर, रोहितदास चौधर,अरविंद भोसले व इतर मान्यवर उपस्तित होते.
नीट , सी ई टी परीक्षेत यश मिळविलेल्या कु साक्षी जालिंदर डोळे , शिद्धेश महादेव चौधर , शिद्धार्थ शाहीर यांचा व पालकांचा सन्मान करण्यात आला.

विद्यार्थांची गुणवत्ता ही शिक्षका बरोबरच पालकांच्या संस्कारावर अवलंबून आहे भविष्यात देशाचे सुजाण नागरिक हेच विद्यार्थी आहेत त्यांनी रुई गावाचे नाव राज्य पातळवीर केले असून त्यांचे कार्य आदर्शवत असल्याचे आयोजक प्रा अजिनाथ चौधर यांनी सांगितले सूत्रसंचालन दादा थोरात यांनी तर
आभार जनार्दन चौधर यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!