स्थैर्य,मुंबई, दि. ४: नुकताच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. या दरवाढीवरुन विरोधकांकडून केंद्रावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही इंधन दर वाढीवरुन केंद्रावर निशाणा साधला आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ ही केंद्राच्या हाती, देशातल्या आणि राज्यातल्या लोकांनी जर केंद्र सरकारने उद्या पेट्रोल 100 रुपये लीटर केले तर आश्चर्य वाटून घेऊ नये, असे पवार म्हणाले.
इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेकडून उद्या राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी फडणवीसांना पेट्रोल दर वाढीचे समर्थन केले असून, शिवसेनेच्या आंदोलनावर टीका केली. यानंतर अजित पवारांनी माध्यमाशी संवाध साधताना केंद्र सरकारवर निशाणा साधला. पवार म्हणाले की, ‘अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या इंधन दर वाढचे समर्थन करता येणार नाही. यापुढे पेट्रोल-डिझेल 100 रुपये लिटर झाले तरी आश्चर्य वाटू नये.
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आलेला अर्थसंकल्प
पवार पुढे म्हणाले की, ‘अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हाती काहीच आले नाही. महाराष्ट्रालाही मेट्रोसाठी निधी मिळाला, पण दाट लोकवस्ती असलेल्या मेट्रोसाठीही द्यायला हवा होता, तो मिळालाच नाही. महाराष्ट्रासोबत केंद्रान दुजाभाव केला आणि केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल यांना जास्त निधी दिला. कारण, तिथे येत्या काळात निवडणुका आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आलेला अर्थसंकल्प, जिथे निवडणुका झाल्या तिथे योग्य प्रमाणात निधी दिला नाही. सेलेब्रिटींनी ट्विट काय करावे त्यांचा अधिकार, सर्वांना घटनेने अधिकार दिले, असेही पवार म्हणाले.
पवार पुढे म्हणाले की, ‘वीज थकबाकीबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 45 हजार कोटी थकबाकी शेतकऱ्यांची बाकी होती. शेतकऱ्यांनी आता फक्त 15 हजार कोटी भरायचे आहेत. 15 हजार कोटी विलंब चार्ज माफ करण्यात आला आहे’, अशी माहिती त्यांनी दिली.