दैनिक स्थैर्य | दि. 19 जानेवारी 2024 | फलटण | कोरेगाव तालुक्यातील आसनगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषि महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना गांडूळ खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक दिले. तसेच शेतकऱ्यांना गांडूळ खताचे पिकांच्या वाढीवर व जमिनीच्या सुपिकतेवर होणारे फायदे सांगितले.
यावेळी गावातील ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी चव्हाण व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नितीषा पंडित, तसेच प्रा.गणेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत शुभम मोरे, विजय नाळे, सिद्धांत फडतरे, अनिकेत मदने, ऋषिकेश चव्हाण, अभिषेक खोसे, अजिंक्य मोरे या कृषी दूतांनी हा कार्यक्रम पार पाडला.