दैनिक स्थैर्य | दि. ३० जानेवारी २०२४ | फलटण |
कोरेगाव तालुक्यातील आसनगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित कृषी महाविद्यालय फलटणच्या आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत बोर्डो मिश्रण तयार करण्याची माहिती शेतकर्यांना दिली.
यामध्ये या मिश्रणाचा उपयोग मुख्यतः फळबागांमध्ये रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी, बुरशीनाशकाचा संत्री, मोसंबी, द्राक्ष, आंबा, चिकू, सिताफळ, बोर इ. फळवर्गीय पिकावरील बुरशीजन्य रोग जसे डिंक्या, अँथ्रकनोज, करपा, पानावरील ठिपके इत्यादी रोगांच्या व्यवस्थापनासाठी कसे उपायकारक आहे, याबद्दलची माहिती शेतकर्यांना दिली.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिशा पंडीत व प्रा. भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत शुभम मोरे, विजय नाळे, सिद्धांत फडतरे, अनिकेत मदने, ऋषिकेश चव्हाण, अभिषेक खोसे, अजिंक्य मोरे या कृषीदूतांनी हा कार्यक्रम पार पाडला.