निसर्गमित्रांकडून भात शेतीत कोया कलम व जपानी पद्धतीचे प्रात्यक्षिक


दैनिक स्थैर्य | दि. १३ जुलै २०२४ | दापोली |
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठअंतर्गत कृषी महाविद्यालय, दापोलीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाच्या ‘निसर्गमित्र’ गटाने कोशिंबळे या गावात कोय कलमाबद्दल माहिती दिली व त्या पद्धतीने कलम कशाप्रकारे बांधून घ्यावे, हे शेतकर्‍यांना प्रात्यक्षिकरित्या करून दाखवले.

जपानी पद्धतीच्या या भातशेतीबद्दल परिसरातील शेतकर्‍यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. यासाठी केंद्रप्रमुख डॉ. मनोज तलाठी सर व ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी जीवन आरेकर, विषयतज्ज्ञ डॉ. महेश कुलकर्णी व डॉ. राजेश मांजरेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवन गोडसे, सौरभ शेडगे, सुमेध वाकळे, अनिश जगताप, आकाश जाधव, अनिकेत काजरेकर, लक्ष्मण माळगी, रिषभ मोरे, या निसर्गमित्रांनी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!