दैनिक स्थैर्य | दि. २९ जानेवारी २०२४ | फलटण |
कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत सांगवी येथील शेतकर्यांना बुरशी रोग नियंत्रित करण्यासाठी बोर्डो मिश्रण बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी सांगवी गावातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने शेतकर्यांनी उपस्थिती दाखवली.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यान- विद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम, विषयतज्ञ प्रा. भोसले सर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कृषीकन्या कु. ऋतुजा भामे, प्रणिता आगवणे, अंकिता कुंभारकर, पूजा चौधर, तनुजा शिंगाडे, अनुजा भिसे यांनी हे प्रात्यक्षिक करून दाखविले.