कॅलिफोर्नियामध्ये 6 फूट उंच महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.३०: अमेरिकेत एकाच महिन्यात दुसऱ्यांदा महात्मा गांधींच्या पुतळ्याचा अपमान केल्याची बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियाच्या एका पार्कमधील गांधींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. एवढेच नाही तर ज्या स्थानावर हा पुतळा स्थापित करण्यात आला होता तिथूनही हटवण्यात आला आहे. भारत-अमेरिकी समुदायाने याला हेट क्राइम म्हणत तपासाची मागणी केली आहे.

डिसेंबरमध्ये वाशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दूतावाससमोर लावण्यात आलेल्या प्रतिमेला खालिस्तानी समर्थकांनी खंडित केल्यानंतर त्यावर पेंट केले होते. भारताने अमेरिकेतील सरकारकडे दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने घटनेचा निषेध केला आहे.

कसा होता पुतळा
न्यूज एजेंसीनुसार, गांधींजींचा हा पुतळा कॅलिफोर्नियाच्या सिटी ऑफ डेविसच्या सेंट्रल पार्कमध्ये स्थापित करण्यात आला होता. याची उंची 6 फूट आणि वजन 294 किलो होते. बुधवारी सकाळी स्थानिक लोकांनी पाहिले की, पुतळ्याचे पाय नव्हते आणि चेहऱ्याचा अर्धा भागही तोडण्यात आला आहे. पार्कच्या एका कर्मचाऱ्याने सर्वात पहिले हे पाहिले आणि प्रशासनाला याविषयी माहिती दिली. पुतळ्याची जागाही बदलण्यात आली होती.

रिपेयरिंग केली जाईल
पोलिस डिपार्टमेंटचे चीफ पॉल डोरोशोव यांनी म्हटले- ‘सध्या या प्रतिमेला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. आम्ही पुतळ्याची रिपेयरिंग करु. ही घटना कधी घडली हे सध्याच सांगता येणार नाही. मात्र ऐतिहासिक पुतळ्याच्या अपमानामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. आम्ही देखील हे प्रकरण गांभीर्याने घेत आहोत.’

भारत सरकारने दिली होती भेट
भारत सरकारने चार वर्षांपूर्वी डेविस सिटीला गांधींजींची प्रतिमा भेट दिली होती. संपूर्ण सन्मानाने ही प्रतिमा स्थापन करण्यात आली होती. मात्र तेव्हा अँटी-गांधी आणि अँटी-इंडिया ऑर्गनायजेशन्सने याचा विरोध केला होता. विशेषतः ऑर्गनाइजेशन फॉर माइनोरिटीज इन इंडिया (OFMI) याचा विरोध करत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी हा पुतळा हटवण्याची मागणी केली होती.

फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटी इंटरनेशनल्स (FISI) ने या घटनेचा विरोध केला आहे. याचे नेता गौरांग देसाई यांनी म्हटले- काही भारतविरोधी लोक येथे द्वेष पसरवत आहेत. यामध्ये खालिस्तान समर्थक देखील आहेत. हिंदूफोबिया पसरवला जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे येथे 2016 मध्ये OFMI ने कॅलिफोर्नियाच्या शाळांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या पुस्तकांमधून इंडिया शब्द काढण्याची मागणी केली होती. त्यांचे म्हणणे होते की, इंडिया ऐवजी साउथ एशिया शब्दाचा वापर करण्यात यावा.


Back to top button
Don`t copy text!