दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटणच्या कसबा पेठेत असणार्या कमलाकर शिवाजीराव आहेरराव व इतर चारजणांनी विनापरवाना अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे. त्यांनी पुरातत्व खात्याची व फलटण नगर परिषदेची कोणतीही परवानगी न घेता या जागेत दोन मजली बांधकाम सुरू केले आहे. या बांधकामामुळे शेजारी असलेल्या माझ्या घराच्या भिंतीतून पाणी येत आहे. तसेच आमच्या भिंतीला ओल आलेली असून त्यामधील असणार्या फर्निचरला मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे माझे खूप मोठे आर्थिक नुकसान सुरू आहे. हे बांधकाम त्वरित थांबवावे, अशी मागणी राजेंद्र सदाशिवराव आहेरराव यांनी फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.
याबाबत त्वरित कारवाई करावी, अशी मागणी राजेंद्र आहेरराव यांनी फलटण नगर परिषदेकडे केली आहे.