
दैनिक स्थैर्य । 9 जून 2025। फलटण । अवकाळी पावसामुळे फलटण तालुक्यात शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व पिके फळबागा, भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठिबक व तुषार सिंचन संच पाईप लाईन वाहून गेली आहे. शेतीचे बांध, ताली फुटून शेतातील माती वाहून गेली आहे. शेतात दगडगोटे साठले आहेत, याचा विचार करून तालुक्यातील शेतकर्यांना एकरी दहा हजार रुपये सरसकटपणे विनाअट आर्थिक मदत करण्याची मागणी पत्रकार अनिलकुमार कदम यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.