अनिल इंगळे यांच्या आत्महत्येस जबाबदार असणार्‍यावर कारवाई करण्याची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण शहरातील दत्तनगर (ता. फलटण) परिसरात राहणारे अनिल महादेव इंगळे यांनी काही दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येची चौकशी करावी व त्यांच्या आत्महत्येस जबाबदार असणार्‍यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांचे भाऊ दादासाहेब महादेव इंगळे (रा. तावडी, ता. फलटण) यांनी फलटण शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत केली आहे.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत दादासाहेब इंगळे यांनी म्हटले आहे की, माझ्या भावाने आत्महत्या करण्यापूर्वी जी चिट्ठी लिहिली आहे, त्यानुसार माझा भाऊ अनिल इंगळे हा त्याची १२ वर्षांची मुलगी हिच्यासोबत दत्तनगर परिसरात राहत होता; परंतु काहीही कारण नसताना संजय ज्ञानेश्वर पवार (रा. दत्तनगर) हा त्याला व त्याच्या मुलीस त्रास देत होता. तसेच संजय पवार याने माझ्या भावास तीनवेळा मारहाण केली आहे. संजय पवार याच्या त्रासास कंटाळूनच मी आत्महत्या करीत आहे, माझ्या आत्महत्येस तोच जबाबदार असून त्यास योग्य शिक्षा द्यावी, असे म्हटले आहे. म्हणून मी माझ्या भावाच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या संजय पवार याच्यावर कारवाई करावी, असे दादासाहेब इंगळे यांनी फलटण शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!