दैनिक स्थैर्य | दि. 19 मार्च 2024 | फलटण | महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याशी माढा लोकसभा संदर्भात बैठकीत झाली आहे. यामध्ये महायुतीचा धर्म पाळावा अशी मला सूचना करण्यात आली परंतु मी माझे स्थानिक लेव्हलचे कार्यकर्त्यांशी व माढा लोकसभा मतदारसंघातील समविचारी नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी निर्णय देणार आहे; असे मत विधानपरिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
यावेळी माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटण परिषदेचे माजी नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थित होती. या व्यतिरिक्त कोणतीही चर्चा झालेली नाही; असे मत यावेळी श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले आहे.