Breking News : शरद पवार माढा लोकसभा लढवणार?


दैनिक स्थैर्य | दि. 19 मार्च 2024 | फलटण | माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार शरद पवार यांनी आज पुणे येथील एका जाहीर कार्यक्रमांमध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमधून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे की; मी लोकसभेची निवडणूक लढवावी असे विधान त्यांनी नुकतेच केले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी शरद पवार हे स्वतः रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पुणे येथील एका कार्यक्रमांमध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार शरद पवार यांनी कार्यकर्त्यांकडून माढा, सातारा व पुणे येथून आपण निवडणूक लढवावी; अशी आग्रही मागणी केली जात आहे. खासदार शरद पवार यांनी या केलेल्या विधानामुळे आगामी माढा लोकसभा मतदारसंघांमधून खासदार शरद पवार हे निवडणूक लढवणार असल्याचे समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघांमधून महाविकास आघाडीच्या नक्की उमेदवार कोण असणार हे समोर आले नव्हते. माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर स्वतः शरद पवार यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे पुन्हा या मतदारसंघातून त्यांना निवडून येणे अवघड नाही असेही बोलले जात आहे.

पुणे येथील जाहीर कार्यक्रमात बोलताना खासदार शरद पवार म्हणाले आहेत की; माढा, सातारा व पुणे येथील कार्यकर्त्यांकडून मी निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी केली जात आहे. गत चार वर्षांपूर्वी मी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. परंतु आत्ताची परिस्थिती तशी नाही.


Back to top button
Don`t copy text!