
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १९ नोव्हेंबर २०२२ । सातारा । विषारी औषध प्राशन केलेल्या सुर्यवंशीवाडी, ता. पाटण येथील एकाचा कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी किसन ज्ञानू पाटील, वय ५५, रा. सुर्यवंशीवाडी यांनी दि. १६ रोजी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना दि. १७ रोजी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची खबर सुनील यादव यांनी मल्हार पेठ पोलीस ठाण्यात दिली.
