सातार्‍यात मेडिटेशन करताना युवकाचा मृत्यू


दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । सातारा । राहत्या घरात मेडिटेशन करत असताना युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातार्‍यातील उपनगरातील कोडोली येथे मंगळवारी घडली.

प्रसन्न प्रल्हाद पवार (वय 27, रा. कोडोली, ता. सातारा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की प्रसन्न पवार हा मंगळवार दिनांक 20 रोजी दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरामध्ये मेडिटेशन करत होता. यावेळी अचानक त्याला भोवळ आली. तो बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्या घरातल्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रात्री बारा वाजता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मेडिटेशन करताना अशा प्रकारची पहिल्यांदाच दुर्दैवी घटना घडल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. प्रसन्नाच्या जाण्याने त्याच्या मित्रांनाही जबर मानसिक धक्का बसला आहे.
या घटनेची सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर धैर्यशील पाटील यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!