मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फलटण अध्यक्षपदी आमदार दीपक चव्हाणांच्या जागी दत्तात्रय गुंजवटे यांची नियुक्ती


दैनिक स्थैर्य | दि. 01 ऑगस्ट 2024 | फलटण | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शासकीय समिती फलटण तालुका अध्यक्षपदी काही दिवसांपूर्वी आमदार दीपक चव्हाण यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर नुकतीच फलटण पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय कांतीलाल गुंजवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तालुका स्तरावर समित्या शासनाने जाहीर केल्या होत्या; त्या समितीवर फलटण तालुका समितीच्या अध्यक्षपदी आमदार दीपक चव्हाण यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर काही दिवसातच अध्यक्षपदी दत्तात्रय गुंजवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर समितीच्या सदस्यपदी सौ. उषा राऊत आणि नानासाहेब इवरे यांची निवड करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!