मुंबईच्या मीरा रोडमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; १२ स्फोटांनी परिसर हादरला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई , दि.८: मुंबईच्या मीरा रोड परिसरात भीषण स्फोट झाले असल्याची माहिती समोर येत आहे. रात्री 2 वाजल्यानंतर राम नगर येथील शांती गार्डन, सेक्टर नंबर 5 येथील एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या सिलेंडरच्या गाडीत हे सिलेंडरचे स्फोट झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. आजूबाजूला दोन सिलेंडरने भरलेल्या गाड्या होत्या त्या दोन्ही गाड्यांना आग लागली होती. आणि त्यातील भरलेल्या सिलेंडरचे रात्री दोन वाजल्यापासून एकामागून एक स्फोट होत होते.

जवळपास 12 स्फोट झालं असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. रात्री झोपी गेलेले रहिवाशी या स्फोटाने पूर्णपणे हादरून गेले आहेत. स्फोट एवढा तीव्र होता की, स्फोटामुळे शेजारील घरांच्या काचा फुटल्या आहेत. सिलेंडरचा पत्रा तसेच गाडीचा पत्रा हा बाजूच्या सोसायटीच्या आवारात पडला होता. सिलेंडरच्या उडलेल्या तुकड्याने एक नागरीक जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

स्फोटानंतर लगेच मीरा भाईंदर अग्निशमन दलाच्या सात अग्निशमन गाड्या, दोन टॅंकर, एक टिटीएल गाडी, तसेच 54 जवान घटनास्थळी दाखल झाले. आणि तीनच्या दरम्यान त्यांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली. अर्धा किमीवरुन अग्निशमन दलाच्या कर्मचारी शीडीवरुन पाण्याचा मारा करत होत्या. उशीरापर्यंत ट्रकमधील लिकेज सिलेंडर शोधण्याच काम सुरु आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ती जागा आरक्षित असल्याने पूर्णपणे मोकळी होती. तेथे नेहमी भरलेल्या सिलेंडरच्या गाड्या लागत होत्या तसेच आजूबाजूला इतर वाहने देखील पार्किंग करत असतात. तसेच काही नागरीकांनी येथे अवैध सिलेंडरची रिफिलिंग होत असल्याचाही आरोप केला आहे. विशेष म्हणजे ही जागा वसई विरार- मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या अगदी मागे शंभर मीटर अंतरावर आहे. पोलीस आयुक्तलायाच्या मागे अवैध गोष्टी चालत असल्यानो नागरीकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!