स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठी साहित्य संमेलन कामकाजासाठी समन्वय समिती गठीत

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 8, 2021
in महाराष्ट्र
ADVERTISEMENT

स्थैर्य, नाशिक, दि.८: नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी विचारात घेत विभागांमधील समन्वयाकरिता सर्वसमावेशक समिती स्थापित करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली.

कोविड-19च्या पार्श्वभूमीवर हे संमेलन होणार असल्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात विविध शासकीय व पोलीस विभागाच्या परवानग्या मिळवणे, तसेच साहित्य संमेलनास आवश्यक सहकार्याच्या दृष्टीने नोडल अधिकारी म्हणून यापूर्वीच उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांची नियुक्ती झाली आहे. ते या समन्वय समितीचे मुख्य समन्वयक राहतील. याकरिता शिबीर कार्यालयही कार्यान्वित झाले आहे. ही समिती सर्वसमावेशक असल्याने संपूर्ण संमेलन काळात समन्वयाचे संपूर्ण काम करेल, असेही शिबीर कार्यालयाद्वारे काढलेल्या आदेशात पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी नमूद केले आहे.

समिती सदस्यांमध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, सहाय्यक कामगार आयुक्त एस. टी. शिर्पे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, कार्यकारी अभियंता नाशिक शहर-1 धनंजय दीक्षित, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत, सहाय्यक पोलीस आयुक्त नवलनाथ तांबे, अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर व साहित्य संमेलन मंडळांच्या 2 सदस्यांचा समावेश राहणार आहे.

बालकट्टा, बालआनंद मेळावा भरणार

नाशिकमध्ये होणाऱ्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालआनंद मेळावा हे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. त्याचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच बालकट्टा, बालकवी संमेलन, कथाकथन आणि बाललेखकांशी संवाद असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. नाशिक शहरात 26 ते 28 मार्च या कालावधीत 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. यात बालकट्टा व बालआनंद मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तीनदिवसीय साहित्य संमेलनात बालकवी संमेलन, कथाकथन आणि बाललेखकांशी संवाद यांचाही समावेश राहणार आहे. या माध्यमातून बालवाचकांमधून लेखक घडावेत, असा प्रयत्न करण्यात येणार आहे.


ADVERTISEMENT
Previous Post

मुंबईच्या मीरा रोडमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; १२ स्फोटांनी परिसर हादरला

Next Post

डोंबिवलीत पडझड झाल्यानंतर मनसेचं जोरदार शक्तिप्रदर्शन, मनसेसैनिक आले एकत्र

Next Post

डोंबिवलीत पडझड झाल्यानंतर मनसेचं जोरदार शक्तिप्रदर्शन, मनसेसैनिक आले एकत्र

ताज्या बातम्या

काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधी पदी सचिन सुर्यवंशी बेडके तर फलटण तालुकाध्यक्ष पदी महेंद्र सुर्यवंशी बेडके यांची निवड

February 25, 2021
उपसरपंच, गुणवरे - प्रा. रमेश आढाव

गुणवरे गावच्या उपसरपंच पदी जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांची निवड

February 25, 2021

जाधववाडी (फ) गावच्या सरपंच पदी सौ. गायकवाड तर उपसरपंचपदी सौ. जगदाळे

February 25, 2021

कोळकी गावच्या सरपंच पदी सौ. नाळे तर उपसरपंच पदी कामठे

February 25, 2021

निंभोरे गावच्या सरपंच पदी सौ. निंबाळकर तर उपसरपंचपदी रणवरे

February 25, 2021

फलटणच्या विश्रामगृहाची तातडीने दुरुस्ती करा; भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांची अप्पर जिल्हाधिकार्यांकडे मागणी

February 25, 2021

प्रसिद्ध पंजाबी गायक काळाच्या पडद्याआड : सरदूल सिकंदर यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन

February 24, 2021

1 मार्चपासून देशभरात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; फक्त ‘या’ लोकांना मिळणार मोफत लस

February 24, 2021

‘या’ कंपन्या देणार मागील वर्षीपेक्षा जास्त पगारवाढ; यंदा चीन आणि अमेरिकेपेक्षा जास्त पगारवाढ भारतात

February 24, 2021

‘हिटलरनेही स्टेडियमला स्वत:चे नाव दिले होते’, जितेंद्र आव्हाडांकडून नरेंद्र मोदींची थेट हिटलरशी तुलना

February 24, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.