कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने अहमदाबादमध्ये संचारबंदी


 


स्थैर्य, अहमदाबाद (वृत्तसंस्था), दि.२० : गेल्या आठ ते १० महिन्यांपासून भारतात थैमान घालत
असलेल्या करोनी विषाणूचा प्रभाव अद्यापही कमी होताना दिसत नाही. लॉकडाऊन
काळात केलेल्या संचारबंदीमुळे काही अंशी रूग्णवाढीच्या वेगाला आळा बसला
होता, पण आता लॉकडाऊनच्या अटी शिथील केल्यानंतर पुन्हा एकदा देशातील मोठ्या
शहरांत कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्यास सुरूवात झाली आहे. गुजरातच्या
अहमदाबाद शहरातदेखील कोरोनाबाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत असल्याने
स्थानिक प्रशासनाकडून अखेर शहरात संचारबांदी लागू करण्याची घोषणा करण्यात
आली आहे.

गुजरातमधील व्यापा-याच्या दृष्टीने
गजबजलेलं शहर म्हणून ओळख असणा-या अहमदाबादमध्ये शुक्रवारी रात्रीपासून ते
सोमवार सकाळपर्यंत कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. संचारबंदीच्या
काळात केवळ दूधविक्री केंद्र आणि मेडिकल दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात
आली आहे. सोमवारनंतरही रात्रीच्या काळात संचारबंदी कायम राहणार असल्याचे
सांगण्यात आले आहे. वन आणि पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्यसचिव राजीव
कुमार गुप्ता यांच्यावर अहमदाबाद शहरातील कोविड परिस्थितीसंबंधीची जबाबदारी
आहे. शहरातील वाढती रूग्णसंख्या पाहता त्यांनी रात्रीच्या काळात
संचारबंदीचे आदेश दिले होते. त्यानंतर काही वेळातच शुक्रवार रात्र ते
सोमवारी सकाळ संपूर्ण संचारबंदीचाही निर्णय जाहीर करण्यात आले.

याशिवाय, शहरातील शाळा खुल्या करण्याच्या
निर्णयावरही स्थगिती देण्यात आली आहे. गुजरात सरकारने २३ नोव्हेंबरपासून
शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश दिले होते. पण आता तो आदेश मागे
घेण्यात आला आहे. ‘शाळा उघडण्याचा निर्णय तात्पुरता रद्द करण्यात आला आहे.
लवकरच याबाबत विचार करून पुढील निर्णय घेण्यात येईल’, अशी माहिती गुजरातचे
शिक्षण मंत्री भुपेंद्रसिंग यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!