
दैनिक स्थैर्य । दि. २२ जून २०२२ । सातारा । रसत्यावर गाडी ओव्हरटेक केल्याच्या कारणावरुन एकाला पाच जणांनी मारहाण केली. ही घटना दि. १९ जून रोजी घडली. याबाबतची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १९ रोजी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास यवतेश्वर, ता. सातारा येथे प्रमोद हॉटेल समोर ओमकार नलवडे (पूर्ण नाव माहीत नाही), शुभम पवार उर्फ दादा पवार, रा. मंगळवार पेठ, सातारा व इतर तीन अनोळखी मुलांनी तुम्ही आमच्या गाडीला तुमची गाडी ओव्हरटेक का केली? असे विचारत शुभम दिलीप गायकवाड रा. व्यंकटपुरा, सातारा यांना मारहाण केली त्यांना सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या मित्राला व चुलत बहिणीलाही मारहाण केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.