
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.०४ मे २०२२ । सातारा । नातवाने गेट वाजवले या कारणावरून एका महिलेसह तिच्या घरातील सदस्यांना मारहाण केली. ही घटना दि. ३0 एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी अझल शिकलगार रा. गोकर्णनगर संगमनगर, सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३० एप्रिल रोजी दीड वाजण्याच्या सुमारास गोकर्णनगर, संगमनगर येथे संगिता सोपान क्षीरसागर, वय ४० यांचा नातू आदित्य हा खेळत-खेळत आझल शिकलगार यांच्या गेट समोर जाऊन त्याने गेट वाजवण्याचा कारणावरून शिकलगार याने संगीता क्षीरसागर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली.
