दुचाकीस्वारास जखमी करणार्‍या कार चालकावर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. २ जुलै २०२१ । सातारा । सातारा-लोणंद मार्गावर आरळे गावच्या हद्दीत चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले आहेत. याप्रकरणी कार चालक राजेंद्र मारूती कदम (रा. आरळे, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती.याबाबत महेंद्र नारायण दयाळ (रा. शिवथर, ता. सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दयाळ हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरुन (एमएच 11- सीझेड 8040) सातारहून लोणंदच्या दिशेने जात होते. यावेळी राजेंद्र कदम हा त्याच्याकडील मारूती कार (एमएच 14 – ए ई 571) भरधाव वेगाने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन चुकीच्या दिशेने चालवत होता. यावेळी त्याने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांच्या पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पुढील तपास हवालदार महांगडे हे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!