जिल्हाधिकार्‍यांचा आदेश मोडल्याप्रकरणीहॉटेल पंगतच्या मालकावर गुन्हा 

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. १२ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा रहिमतपूर रस्त्यावर जिहे, ता. सातारा गावच्या हद्दीतील हॉटेल पंगतच्या मालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, सातारा-रहिमतपूर रस्त्यावर अविनाश रमेश देसाई याचे हॉटेल पंगत हे हॉटल आहे. जिल्हाधिकार्‍यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जारी केलेले आदेश मोडून देसाई याने रात्री बारानंतरही हॉटेल सुरू केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी देसाई याच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार सावंत करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!