स्थैर्य, सातारा , दि. १६: कोवीडच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, मेढा, ता. जावली येथे हॉटेल सुरू ठेवण्याचा प्रकार निदर्शनास येताच मेढा पोलिसांनी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला आहे. रविंद्र शंकर शिंदे रा. मेढा, ता. जावली असे त्याचे नाव आहे.
रवींद्र शिंदे याने मेढा चौकातील हॉटेल कोयना उपाहारगृह दि. 14 रोजी सकाळी 8 वाजता सुरू ठेवून ग्राहकांना चहा-नाष्टा देत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मेढा पोलिस ठाण्याचे हवालदार जितेंद्र कांबळे यांनी तक्रार दिल्यानंतर शिंदेविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.