खिंडवाडी येथे एकाला मारहाण पाच जणांवर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । सातारा ।  शिवी का दिली? याबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून खिंडवाडी येथील एकाला मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रसाद जाधव उर्फ काण्या रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा, अभिजित दत्तात्रय सावंत व पप्पू जाधव (दोघे रा. खोकडवाडी, ता. सातारा) व त्यांच्या दोन साथीदारांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. सुरज साहेबराव जाधव रा. खिंडवाडी, ता. सातारा यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिवी का दिली याबाबत विचारणा केल्यावरून संशयीतांनी रॉड, दांडके व दगडाने मारहाण केल्याचे सुरज यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार इंगवले हे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!