मारहाण केल्याप्रकरणी तिघाजणांवर गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । सातारा ।  खिंडवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत तेथीलच एकाला शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी तिघाजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, दि. 3 जुलै रोजी सातारा औद्योगिक वसाहत ते खिंडवाडी जार्णा­या मार्गावर सुरज साहेबराव जाधव रा. खिंडवाडी हे दुचाकीवरुन जात असताना समोरुन आलेल्या इनोव्हा कारमधील प्रसाद जाधव उर्फ कान्ह्या (रा. चिंचणेर वंदन), अभिजीत दत्तात्रय सावंत, पप्पु जाधव (दोघेही रा. खोकडवाडी, ता. सातारा) यापैकी एकाने त्यांना शिवीगाळ केली. याचा जाब विचारला असता त्या तिघांनी सुरज जाधव यांना लोखंडी रॉड व दांडक्याने मारहाण केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!