मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.२१ मार्च २०२२ । सातारा । पिकअप गाडीमधून जात असताना या वाहनाला गाडी आडवी मारुन ती थांबवून दोघांना मारहाण करत लुटमार केली. ही घटना दि. १९ मार्च रोजी घडली. याप्रकरणी अमिर नजीर सय्यद वय २५, रा. निंबुत ता.बारामती यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर रोहित कुंभार व संकेत गुजर दोघे रा. करंजे पेठ, सातारा यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, तक्रारदार हे त्यांच्या चुलत्यासोबत पिकमधून साहित्य घेवून बारामतीला निघाले होते. ते भूविकास चौकात आल्यानंतर त्यांना संशयित दोघांनी अडवले ‘तुला समजत नाही का? गाडी कशी चालवतो,’ असे म्हणत खाली उतरवून मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच ५00 रुपये दे नाहीतर काच फोडीन, अशी धमकी दिली. पैसे नसल्याचे सांगताच संशयितांनी पिकअप गाडीची काच फोडली. यावेळी तक्रारदार यांचे चुलत्यांनाही मारहाण करुन त्यांच्याकडील रोख १५0 रुपये जबरदस्तीने चोरुन नेले. या सर्व प्रकारामुळे तक्रारदार यांच्यासह चुलते घाबरुन गेले होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!