थर्टी फस्टला रात्री उशिरा हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी तीन हॉटेल मालकांवर गुन्हा 


स्थैर्य, सातारा, दि. ३: जिल्हाधिकार्‍यांचा आदेश डावलून थर्टी फस्टला हा ॅटेल्स उशिरा सुरू ठेवल्याप्रकरणी सातारा तालुक्यातील म्हसवे येथील हॉटेल  मलबार, लिंब फाटा येथील ढाबा शेरे पंजाब आणि शेंद्रे हद्दीतील हॉटेल समरथल हा ॅटेलच्या मालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, कोवीड-19च्या अनुषंगाने खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी  शेखरसिंह यांनी थर्टी फर्स्टला रात्री उशिरा हॉटेल्स, ढाबे उघडे ठेवून गर्दी जमवू नये,  असे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने 31 डिसेंबरच्या रात्री पोलीस गस्त घालत  होते. यावेळी म्हसवे, ता. सातारा गावच्या हद्दीतील हॉटेल मलबार रात्री 11.20  वाजता सुरू असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी हवालदार रविंद्र भोरे यांनी  फिर्याद दिल्यानुसार हॉटेलचालक मनचूर आमचुंडी गंडी याच्याविरोधात गुन्हा दाखल  झाला आहे. तपास पो. ना. पाटोळे करत आहेत.
दरम्यान, लिंब फाटा येथेही थर्टी फर्स्टला रात्री पाऊण वाजता ढाबा शेर ए पंजाब  सुरू असल्याचे पोलिसांना दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी धाबा मालक दिल प्रितसिंह हरजितसिंह वय 22, रा. देहरादून (उत्तराखंड) याच्यावर गुन्हा दाखल के ला आहे. तपास हवालदार बागवान करत आहेत.
त्याचप्रमाणे 31 डिसेंबर होवून गेल्यावरही पहाटे सव्वा तीन वाजेपर्यंत शेंद्रे  फाट्यावरील हॉटेल समरथल सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रक रणी पोलीस नाईक दीपक पोळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हॉटेल मालक राजू  बिष्णोई वय 36 रा. शेंद्रे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button
Don`t copy text!