
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि.१५: सातारा येथील प्रतापगंज पेठ येथे जिल्हाधिकारी यांचा आदेश मोडून सुमन साडी सेंटर हे दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी दुकान मालकावर शाहुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने शाहूपुरी पोलीस पेट्रोलिंग करत असताना पो. ना. कोमल पवार यांना प्रतापगंज पेठेतील सुमन साडी सेंटर हे दुकान सुरू असल्याचे आढळून आले. त्यांनी दुकानात जावून चौकशी केली असता नीता संजय महाडिक वय 50 रा. प्रतापगंज पेठ, सातारा या दुकान मालक असून त्यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन करत दुकान सुरू ठेवल्याचे समजले. याप्रकरणी नीता महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
