
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । सातारा । रजेचा कालावधीत संपला तरी, कारागृहा बाहेर अनाधिकृतपणे कारागृहा बाहेर वास्तव्य करत असल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अजय धोंडीराम कोकरे रा. ४०, रा. मंगळवार पेठ, सातारा असे त्याचे नाव आहे.
एका गुन्ह्यामध्ये तो सध्या कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला १२ जून पर्यंत रजा सवलत देऊन घरी सोडण्यात आले होते. परंतु, मुदत संपली तरी तो कारागृहात हजर राहिला नाही. त्यामुळे याबाबत कारागृहातील अधिकारी दिलीप सर्जेराव पोवार रा. कोल्हापूर यांनी याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबतचा अधिक तपास हवालदार चव्हाण हे करत आहेत.
