विवाहितेच्या जाचहाटप्रकरणी पती, सासू-सासर्‍यावर गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. १८: विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती व सासू-सासर्‍यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सौ. सारिका तेजस फाळके रा. निगडी प्राधिकरण जि. पुणे सध्या रा. जिहे. ता. सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पती तेजस फाळके, सासरे रणजित बाजीराव फाळके आणि सासू मालिनी फाळके सर्व रा. निगडी प्राधिकरण जि. पुणे यांनी जून 2013 ते 15 एप्रिल 2021 दरम्यान वेळोवेळी मंगलमूर्ती वाढेफाटा, सातारा आणि निगडी प्राधिकरण येथे फिर्यादीला उपाशीपोटी ठेवून घरगुती कारणावरून शारीरिक आणि मानसिक छळ केला. हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तिघांवरही गुन्हा दाखल झाला असून पो. उपनिरीक्षक कदम तपास करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!